। पेण । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणार्या झोतिरपाडा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी ग्रामविकास आघाडीचे उमेदवार प्रसाद कुथे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहा महिन्यांपासून आधीच्या उपसरपंचांवर अविश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्याने सदरचे पद रिक्त झाले होते. सोमवारी झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडीत प्रसाद कुथे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या संपूर्ण निवड प्रक्रियेत युवा नेते प्रसाद भोईर तसेच जिल्हा परिषद बांधकाम सभापती नीलिमा पाटील यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले, म्हणून त्यांचे विशेष आभार नवनिर्वाचित उपसरपंच प्रसाद कुथे यांनी व्यक्त केले.