। खांब । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील मढाळी बु. शाळेतर्फे बुधवारी (दि.20) मतदार जनजागृती कार्यक्रम घरोघरी अभियान राबवून संपन्न करण्यात आला.
स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रम अंतर्गत शालेय शिक्षणापासून विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व कळावे या उच्च विचाराने रा.जि.प. मढाळी बु. शाळेतील जगन्नाथ आब्दागिरे, सुजाता कांबळे यांच्या मार्गदर्शनातून व ग्रामस्थ तसेच, महिला वर्ग व तरूण मंडळाचे लाभलेल्या सहकार्यातून मतदारांच्या तथा पालकांच्या वाडी वस्तीवर जाऊन घरोघरी भेटी देऊन त्यांना मतदानाचे महत्व सांगण्यात आले. पालकवर्गाला आपल्या पाल्याकडून पत्राद्वारे एक भावनिक साद घालून मतदान करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. शासनाने ठरून दिलेल्या धोरणांचा प्रत्यक्ष अनुभूती मतदारापर्यंत पोहचल्यामुळे व राष्ट्रीय कार्यक्रमास विद्यार्थी वर्गानेही सक्रिय सहभाग घेऊन प्रत्यक्ष जनजागृतीचे काम केल्यामुळे तहसीलदार रोहा तसेच, गावातून व परिसरातून विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे.