| उरण | वार्ताहर |
वातावरणातील बदलांमुळे उरण तालुक्यातील तापमानाचा पारा 30 अंशांच्या पुढेच रेंगाळला असल्याने दुपारी रस्त्यावरून फिरताना उन्हाचे चटके आणि उकाडा वाढला आहे. रात्रीचा गारवाही काही ठिकाणी हरवला आहे. गुरुवारी (दि. 21) सलग दुसर्या दिवशी तापमानात वाढ होऊन दिवसभरात कमाल 30.9 आणि 10.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याची माहिती प्राप्त होत आहे.
वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि डोंगर परिसरातील उत्खनन, दगड खाणींत होणारे स्फोट तसेच, वातावरणातील बदलामुळे तालुक्यातील तापमानाचा पारा चढत आहे. त्यामुळे दुपारी रस्त्यावर मार्गक्रमण करणार्या प्रवाशी नागरीकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. मार्च महिन्यातील वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी शितपेयांचा आसरा घेताना दिसत आहेत.