| उरण | वार्ताहर |
उरण परिसरात दोन अज्ञात मृतदेह सापडले आहे. त्यामध्ये एक महिलेचा व एक पुरुषाचा असल्याचे समजते. त्यांची ओळख पटली नाही. सदर आत्महत्या की हत्या अशी चर्चा सुरू आहे. यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.
गुरुवारी (दि. 25) सकाळी तालुक्यातील चिरनेर दिघाटी रस्त्यावर अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला आहे. तर, उरण कोटनाका येथे अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. दोन्ही मृतदेह सापडले; परंतु त्यांची अद्याप ओळख पटलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात महिलेचा व पुरुषाचा मृतदेह सापडले आहेत. त्यांची ओळख न पटल्याने ही आत्महत्या की हत्या, अशा चर्चेला उधाण आले आहे. यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.