। सुकेळी । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावरील गोडसई गावाच्या हद्दीमध्ये फाॅरच्युनर कार व कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात कार चालक गंभीररीत्या जखमी झाला आहे. हा अपघात शनि. दि.२७ रोजी पहाटेच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहीतीनुसार, शनिवारी (दि.27) मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईकडे जाणारी कार (एमएच-43-बीई-1235) ही गोडसई गावाच्या हद्दीमध्ये आली असता समोरून येणारा कंटेनर (एमएच-46-एएफ-7683) चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे समोरासमोर जोरदार धडक बसुन भीषण अपघात घडला. या अपघातात कार चालक जगदिश पांडुरंग भुर्टे (66) परेल-मुंबई, हे गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना तातडीने एमजीएम रुग्णालय कामोठे येथे अपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच वाकण टॅबचे कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन दोन्ही वाहने क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावरुन बाजुला करुन वाहतूक सुरळीतरीत्या सुरु केली. शनिवार व रविवार सुट्टीचा दिवस तसेच लग्नसराई सुरु असल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या अपघाताचा पुढील तपास नागोठणे पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक हरेष काळसेकर करीत आहेत.