बेसिक फ्लड रेस्क्यू कोर्स व पीबीएच प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
| पाली /बेणसे | वार्ताहर |
रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि महाराष्ट्र इंडियन रेस्क्यू अकादमी यांचे संयुक्त विद्यमाने कोलाड येथे 23 एप्रिल ते 3 मे रोजी दहा दिवसीय बेसिक फ्लड रेस्क्यू कोर्स आणि पीबीएच प्रमाणपत्र निवासी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणार्थींना आंतरराष्ट्रीय सागरी संघटना मान्यता प्राप्त प्रमाणपत्र देण्यात आले.
सदर प्रशिक्षणात रायगड जिल्ह्यातील स्वयंसेवकांना विविध प्रकारचे रेस्क्यू ट्रेनिंगचे धडे, थेरी व प्रात्यक्षिकाचे प्रशिक्षण देण्यात आले. वाढत्या समस्यांचे निवारण करणे ही काळाची गरज बनली आहे. अशातच भविष्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन रायगड प्रमुख सागर पाठक व इंडियन रेस्क्यू अकॅडमी रोहा कोलाड यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. सदर प्रशिक्षणामध्ये नागरी संरक्षण दल, आपदा मित्र, पोलीस मित्र, एनसीसी कॅडेट, एनएसएस स्वयंसेवक, रेस्कुअर, गिर्यारोहक आणि सामाजिक संस्थांमध्ये पुढाकाराने समाजकार्य करणारे स्वयंसेवक उपस्थित होते.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन रायगड प्रमुख सागर पाठक साहेब, इंडियन रेस्क्यू अकॅडमी रोहा कोलाड, जनरल मॅनेजर अमोल जाधव, कॉर्डिनेटर राजेंद्र पाटील, मास्टर ट्रेनर देविदास पाटील, मास्टर ट्रेनर कोंडाला राव, राज भोई, विनय पारंगे, अनिकेत जाधव, शुभम जाधव, अमित खैरे, राज तांबे, रुचिका शिर्के, सुयोग शिंदे, अनुप देशमुख व कॅन्टीन मॅनेजर बाळकृष्ण शेलवले इत्यादी प्रशिक्षकांनी यशस्वीरित्या प्रशिक्षण दिले.
विविध रेस्क्यु पद्धतींचे प्रशिक्षण या प्रशिक्षणात प्रामुख्याने विविध गाठींचे प्रकार, प्रथमोउपचार, सीपीआर, स्क्युबा,असेंडिग-डिसेडिंग, बोट हॅन्डलिंग, बोट पॉडलींग, रिवर क्रॉसिंग, पोहणे, इत्यादी अनेक नवीन रेस्क्यूच्या पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात आले.