नागोठणे | वार्ताहर |
शंभर वर्षे पूर्ण होत असलेल्या कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई या संस्थेच्या मुलुंड येथील विद्यार्थी वसतिगृहासाठी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार कडून मंजूर करण्यात आलेला 5 कोटी रुपयांचा धनादेश मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते समाजोन्नती संघाच्या पदाधिकार्यांकडे सुपूर्द करण्यात आला. भुषण बरे, संदीप राजपुरे, शंकरराव कांगणे, शिवरामभाऊ शिंदे, सुरेश मगर, रामभाऊ सकपाळ, अनंत थिटे, गुणाजी पोटपोढे, सतीश भगत, महेश बामुगडे उपस्थित होते.






