। माथेरान । वार्ताहर।
माथेरानमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याचे लोंढे वहात असल्याने काही ठिकाणी मातीची धूप होते. रस्त्याच्या बाजूला असणार्या ब्रिटिशकालीन मोर्या दरवर्षी मातीच्या भरावाने भरतात. त्यामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत असते. परिणामी रस्त्याची धूप होऊन रस्ते खड्डेमय होत असल्याने हातरिक्षा, घोडा तसेच पायी चालत जाणार्या लोकांना खूपच त्रासदायक बनतात. यासाठी अनेक भागातील पावसाळी गटारांची साफसफाई करून चांगल्या पद्धतीने गटारे आणि मोर्याचे नियोजन करण्यात आले आहे. पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे आणि मोर्यांची कामे अत्यंत नियोजन पद्धतीने मुख्याधिकारी राहुल इंगळे, अन्सार महापुळे, नरेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम प्रकारे मार्गी लावली जात आहेत.