। उरण । वार्ताहर ।
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात राखीव खाटा उपलब्ध करून देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पूर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात मदत करणे तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणे संदर्भात योग्य मार्गदर्शन करणे, पंतप्रधान वैद्यकीय सहायता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, सिद्धिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट आदींच्या माध्यमातून गरजु रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देणे या कामी उरण मधील शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांची निवड शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या रायगड रायगड जिल्हा समन्वय पदी करण्यात आली आहे.