| रोहा | प्रतिनिधी |
कर्नल जयेश निमिषा नंदकुमार देसाई यांना लेफ्टनंट कर्नलपदी पदोन्नती मिळाली आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यसाठी ही अभिमानास्पद बाब असून त्यांच्या पदोन्नतीचे सर्वत्र स्वागत होत असून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.
निमिष यांना शालेय जीवनापासून विविध बाबींची आवड असल्याने शिक्षणाबरोबरच त्यांनी खेळ व विविध स्पर्धा उपक्रमात नेहमीच आपल्या यशाची चमक दाखवून उज्ज्वल कामगिरी केली. सैन्यदलात रूजू झाल्यापासून तेथे त्यांनी मनापासून देशसेवा करून मिळेल ती जबाबदारी यथायोग्य पद्धतीने पार पाडल्याने त्यांना वेळोवेळी विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली. सेवेचे फलित म्हणून सैन्यदलात त्यांना लेफ्टनंट कर्नलपदी पदोन्नती मिळाली आहे. सैन्य दलातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल यापूर्वी त्यांना सुवर्णपदकही प्राप्त झाले आहे.