। मुरूड । वार्ताहर ।
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मानवाकडून कोणकोणत्या बाबींची दक्षता घेतली पाहिजे. कांदळवन तोडीचे प्रमाण घटले पाहिजे. त्याचप्रमाणे पावसाचे प्रमाण कायम म्हणजेच सर्वत्र पाऊस हा किमान 2200 मिलीमीटर एवढा पडणे खूप गरजेचे आहे. यासाठी जनजागृती करण्यासाठी परिमंडळ वनाधिकारी डॉ.निलेश चांदोरकर यांनी एक पुस्तक लिहिले असून त्याचा नुकताच एक प्रकाशन सोहळा संपन्न झाला आहे.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून परिमंडळ वनअधिकारी डॉ. निलेश चांदोरकर, वनविभाग लिखित कांदळवनांच्या तोडीचा किनारपट्टीवरील लोकांच्या जीवनावर झालेला परिणाम तसेच वनहक्क कायदा 2006 च्या अंमलबजावणीचा पश्चिम घाटातील सरकारी वन क्षेत्रावर झालेला परिणाम या दोन विषयांवरील पुस्तकांच्या इंग्रजी आवृत्तीचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी नवी मुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त मीरा बनसोडे यांच्या शुभ हस्ते पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा संप्पन्न झाला. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयशिल पालकर, पर्यावरण व राजकीय समन्वयक, संदेश ठाकूर, शैलेश खोत, गायत्री पारकर, वास्तू विशारद सुजित विचारे, सोनाली विचारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. विविध वक्त्यांनी आपले विचार व्यक्त करून र्हास होत चालेल्या पर्यारवरणाविषयी चिंता व्यक्त केली. यासाठी शासन स्तरावर पर्यावरण जतन होण्यासाठी कडक कायदे अमलात आणले जावे, असे मत व्यक्त करण्यात आले.