। खांब । वार्ताहर ।
पर्यावरण जनजागृती व संवर्धनासाठी गेली अनेक वर्षे कार्यरत असणार्या ईडब्लूए कंपनीच्यावतीने धाटाव औद्योगिक वसाहतीमधील अॅन्थिया कं. युनीट 2 या कंपनीच्या आवारात वृक्षारोपण करून पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी ईडब्लूए कंपनीचे सीईओ लोचन तुपकर, जनरल मॅनेजर अमोल बागडे, निलेश राऊळ व कंपनीचे कर्मचारी वर्ग यांच्यासह सतिष महाले, सुयोग देवकर, जागृती राऊत, मानशी बिरगावळे, महेश तुपकर आदी उपस्थित होते. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून रोहा-कोलाड मार्गावरील आयडीबीआय बॅक आणि ब्रेंडा कॉम्लेक्स या रहिवासी संकुल परिसरात देखील वृक्षारोपण करण्यात आले.







