। पाली/बेणसे । वार्ताहर ।
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महाश्रमदान दिवस म्हणून साजरा झाला. या दिवसाचे औचित्य साधून सिद्धेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील वावळोली येथे ग्रामसफाई मोहीम राबविण्यात आली. तसेच यावेळी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली. यावेळी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत कृतिशील कार्यक्रमावर भर देण्यात आला.
पंचायत समिती सुधागड, ग्रामपंचायत सिद्धेश्वर, प्राइड इंडिया व सुकन्या ग्रामसंघ यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी तहसीलदार दिलीप रायण्णावार, गटविकास अधिकारी विजय यादव, कृषी अधिकारी अशोक महामुनी, एमआरएलएमच्या अनुराधा गायकवाड, प्राईड इंडियाचे प्रकल्प व्यवस्थापक वसंत मोरे, ग्रामसेवक ए.टी. गोरड, सुकन्या ग्रामसंघाच्या अध्यक्षा प्राजक्ता यादव, पोलीस पाटील सुधीर महाले, ग्रामपंचायत सदस्य संजना फाळे, रजनी जाधव उपस्थित होते. सुकन्या ग्राम संघामधील बचत गटातील महिला व ग्रामस्तांबरोबर सर्व अधिकारी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राइड इंडियाच्या रोशना महाले, सचिन मुंढे, गणेश महाले, विजय महाले, स्नेहा यादव, प्राची कदम, मयुरी महाले वावळोली ग्रामस्थ आणि महिला यांनी विशेष मेहनत घेतली. ही मोहीम यशस्वी केल्याबद्दल सरपंच उमेश यादव यांनी सर्वांचे आभार मानले.