। रसायनी । वार्ताहर ।
कुंभार समाज सामाजिक संस्था खालापूर यांची अनंत महाडकर व रायगड जिल्हा कार्यकारणी यांच्या मार्गदर्शना खाली अत्त्करगाव येथे वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न झाली. या सभेचे आयोजन अध्यक्ष राजेंद्र विष्णू साळवी, युवक अध्यक्ष स्वप्निल नागावकर यांनी केले असून सभेचे नियोजन आत्करगाव कुंभार समाज कमिटी तसेच अत्करगाव कुंभार समाज बांधव आणि महिलावर्ग यांनी केले होते.
यावेळी कुंभार समाज खालापूर तालुका महिला आघाडी यांची नियुक्ती करण्यात आली असून, खालापूर तालुका अध्यक्षा सविता मांडलेकर, उपध्यक्ष सुरेखा हातनोलकर, सचिव चंदा वाडेकर, खजिनदार पूजा हातनोलकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच, खालापूर तालुका कुंभार समाज युवक खजिनदार म्हणून महेश निर्गुळकर यांची नियुक्ती करण्यात आली असून रायगड जिल्हा अध्यक्ष अनंत महाडकर यांच्याकडून या सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांना नियुक्ती पत्रक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गजानन चौलकर, कैलास वाडेकर, दलीप साळवी, रामदास साळवी, वाळकु बोरीटकर, अशोक खेडेकर, रामचंद्र मंग्रुळकर, गणेश चोनकर, दिल्पेश वाडेकर तसेच, अत्तर गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ आणि महिला वर्ग मोठ्यासंखेने उपस्थित होते.