। पाली । वार्ताहर ।
सुधागड एज्युकेशन सोसायटीचे शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज याची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी डॉ.एम.ए. बडगुजर यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले कि, भागवत धर्माच्या झेंड्याखाली निरनिराळ्या जातीजमातींना एकत्र आणण्याचे महान कार्य संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत सेना न्हावी, संत नरहरी सोनार इ. सर्व जातीतील संतांनी केले आणि जातिभेद मोडण्याचे, नाहीसे करण्याचे तेच महान कार्य कायदा व कृतीद्वारे राजर्षी शाहू महाराजांनी केले. आजच्या तरुणांनी व विद्यार्थ्यांनी शाहू महाराजाचे कार्य अवगत करून वाटचाल करावी, असे अध्यक्षीय भाषणात डॉ. बडगुजर यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहल बेलवलकर यांनी केले. तसेच, यू. बी. इनामदार, डॉ. एम.ए. सोहनी, विशाखा मानकामे, दीपाली बांगारे, भक्ती साजेकर व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा जांबेकर व आभार संतोष भोईर यांनी केले.