। नागोठणे । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यात अनेक वैविध्यपूर्ण योजना सुरु केल्या आहेत. यातीलच एक महत्वाकांक्षी अशी शालेय मुलींसाठी योजना असलेल्या अहिल्याबाई होळकर मोफत विद्यार्थिनी पास योजनेअंतर्गत कोएसोच्या नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील एस.पी. जैन ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थिनींना मोफत पासचे वाटप नागोठणे स्थानकाच्यावतीने करण्यात आले.
रोहा आगाराचे वाहतूक निरीक्षक अजिंक्य रोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत एस.पी.जैन ज्यनिअर कॉलेजमध्येच संपन्न झालेल्या या कार्यक्रमालावरिष्ठ लिपिक संदीप गायकवाड, नागोठणे स्थानकाचे वाहतूक नियंत्रक प्रसाद पाटील, कॉलेजच्या प्राचार्या राधिका ठाकूर, शिक्षक के.एन. पवार, एन.एन. गायकवाड, इतर शिक्षक वृंद व विद्यार्थींनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.