शिहुतील रक्तदान शिबीर यशस्वी
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
रक्तदानाचे महत्त्व लक्षात घेऊन शिहू येथील डॉ. पुरुषोत्तम भोईर यांच्या हॉस्पिटलमध्ये नुकतेच रक्तदान शिबिराचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते. रायगड मेडिकल असोसिएशन व रोहा तालुका मेडिकल चॅरिटेबल असोसिएशन, रायगड अलिबाग रक्तपेढी यांच्या सहकार्याने व डॉ. पुरुषोत्तम भोईर, माजी आर.एम.ए. सेक्रेटरी यांच्या विशेष प्रयत्नाने एक सामाजिक बांधिलकी व जबाबदारी म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले.
या शिबिराच्या प्रारंभी आरएमएचे अध्यक्ष डॉ. निशीगंध आठवले व माजी अध्यक्ष डॉ. रोहिदास शेळके यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. परिसरातील दानशूर व्यक्तिमत्त्व प्रसाद भोईर यांनी यावेळी प्रथम रक्तदान देण्याचा बहुमान मिळविला. तद्नंतर एकूण 42 रक्तदात्यांनी रक्तदान करून रुग्णांना दिलासा देण्याचे समाजकार्य केले आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व नामवंत डॉक्टरांनी रक्तदान शिबिरात सहभाग दर्शवून मानवतेचे दर्शन घडविले.
यावेळी आरएमएचे सेक्रेटरी डॉ. चांदोरकर आणि उद्योगरत्न, महाराष्ट्र भूषण प्रसाद भोईर यांनी श्रीगणेशाचे पूजन केले. आणि डॉ. राजेंद्र धात्रक, डॉ. सुनील पाटील, डॉ. मिलिंद धात्रक, डॉ. दिपक गोसावी, डॉ. कोकणे, डॉ. सोष्टे, डॉ. हाफीज, डॉ. पुरुषोत्तम भोईर डॉ. प्रिया भोईर, डॉ. साधना झोलगे, डॉ. अश्विनी कुथे यांच्या हस्ते आरोग्याची देवता धन्वंतरीचे पूजन करण्यात आले. तद्नंतर रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ. निशिगंधा आठवले, डॉ. रोहिदास शेळके. डॉ. चांदोरकर सेक्रेटरी, प्रसाद भोईर, संजय भोईर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
यावेळी के.के. कुथे, दामोदर भोईर, लक्ष्मण खाडे, रमाकांत भोईर, दिपक पाटील (शिवसेना विभाग प्रमुख), वसंत मोकल, हिरामण कोकाटे, मनोज पाटील, एन.जी पाटील, डॉ. नित्यानंद कुथे, विशाल दिवेकर, दिपक केणी, पो.पा. दिलीप भोईर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. डॉ. पुरुषोत्तम भोईर यांनी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सन्मान व सत्कार केला. डॉ. सुनील पाटील यांना आरोग्यम धनसंपदा पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचा डॉ. पुरुषोत्तम भोईर यांनी सन्मान केला. रक्तदान शिबिरात रोहा येथील डॉ. म्हात्रे, रोहा तालुका मेडिकल चॅरिटेबल असो.चे सेक्रेटरी डॉ. अतुल पाटील, डॉ. प्रशांत गोसावी, डॉ. निखिल गरुडे, डॉ. साधना झोलगे इत्यादी डॉक्टरांनीसुध्दा रक्तदान करून जनजागृती केली आहे. या शिबिरामध्ये उत्तम योगदान देणार्या रायगड अलिबाग रक्तपेढीमधील डॉक्टर्स टीमचे तसेच या शिबिरासाठी भरीव योगदान देणार्या डॉ. पुरुषोत्तम भोईर यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.