• Login
Friday, July 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

संयुक्त किसान मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Krushival by Krushival
August 8, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
संयुक्त किसान मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
0
SHARES
26
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेतकरी, आदिवासी समाजाच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याची मागणी

| खास प्रतिनिधी | रायगड |

अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर संयुक्त किसान मोर्चातर्फे गुरुवारी (दि. 8) आंदोलन छेडण्यात आले. शेतकरी, शेतमजूर, मच्छिमार आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. सर्वहारा जनआंदोलनाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, बांबू कामगार संघटना जिल्हा सरचिटणीस संदीप नागे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

अलिबाग शहरातील शेतकरी भवन येथून सकाळी साडेअकरा वाजता मोर्चास सुरुवात झाली. या मोर्चामध्ये अलिबाग, रोहा, तळा, माणगाव, मुरुड आदी तालुक्यांतील शेतकरी, आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आदिवासी बांधवांतर्फे मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.

शेतकरी, कामगार व श्रमिक वर्गाचे देशभर तीव्र होत असलेले प्रश्‍न केंद्रस्थानी आणण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने दिल्ली येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय मेळाव्यात देशभर 8, 9 ऑगस्ट रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. महाराष्ट्रात त्यानुसार संयुक्त किसान मोर्चात सहभागी प्रमुख 13 शेतकरी संघटना या आंदोलनात उतरल्या आहेत. राज्यात विविध ठिकाणी पूरपरिस्थिती आहे. शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. कामगार कर्मचार्‍यांचे प्रश्‍न तीव्र झाले आहेत. महागाई व बेरोजगारी भयावह प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत जाती-धर्माच्या मोर्चा, मेळाव्यांना परवानग्या दिल्या जात असताना श्रमिकांच्या मूलभूत प्रश्‍नांना वाचा फोडणार्‍या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी करण्यात येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. राज्य सरकार व पोलीस प्रशासनाची ही अत्यंत लोकशाहीविरोधी कृती आहे. केंद्र व राज्य सरकारने जाती व धर्माच्या बाबत जनतेला आपसात झुलवीत जनतेच्या मूलभूत प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करणे थांबवावे व शेतकरी, मच्छिमार तसेच संघटित व असंघटित श्रमिकांचे ज्वलंत प्रश्‍न तातडीने सोडवावेत, असा इशारा संयुक्त किसान मोर्चा व कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या प्रतिनिधींनी केंद्र व राज्य सरकारला दिला आहे.

यावेळी सर्वहारा जनआंदोलनाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, बांबू कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष संदीप नागे, भगवान नाईक आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी सर्वहारा जनआंदोलनाच्या खजिनदार चंदादेवी तिवारी, पांडुरंग वाघमारे, उमेश ढोमणे, रघु नाईक आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मोर्चातर्फे जिल्हा प्रशासनाना निवेदन देण्यात आले.

मोर्चाच्या मागण्या
रायगड जिल्ह्यातील कष्टकरी, शेतकरी, आदिवासी, स्थलांतरीत मजूर यांचे प्रश्‍न लक्षात घेऊन, पीक विमा योजनेत शेतकरी हिताचे आमूलाग्र बदल, शेतकरी शेतमजुरांना पेन्शन, स्मार्ट मीटर योजना व विजेच्या खासगीकरण थांबवावे, कृषी निविष्ठा, बी-बियाणे औषध हे जीएसटीमुक्त करावे, 2013 च्या भूमी अधिग्रहण कायद्याची तसेच वनाधिकार कायद्याची कसून अंमलबजावणी करावी, बागायत आणि सिंचनाखाली आणलेल्या जमिनीचे अल्प मोबदल्यात विविध महामार्गासाठी सक्तीचे होत असलेले अधिग्रहण ताबडतोब थांबवावे. राज्याचे 14 जिल्ह्यात रेशन बंद करण्याचे कारस्थान, शेतमजुराचे किमान वेतन, मच्छिमार समाजाचे प्रश्‍न या व इतर अनेक ज्वलंत स्थानिक प्रश्‍नांवर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

Related

Tags: Collector Officesindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newsSamyukt Kisan Morchasocial media news
Previous Post

हवेलीत मेगा मॅरेथॉनचे आयोजन

Next Post

माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

बेली पुलावर अपघात

July 10, 2026
पनवेल

तळोजा गावात कचरा रस्त्यावर

July 10, 2026
पूर्वसूचना देऊनही बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
sliderhome

पूर्वसूचना देऊनही बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

July 10, 2026
खारेपाटात वादळापेक्षा निकृष्ट कामाचा फटका?
sliderhome

खारेपाटात वादळापेक्षा निकृष्ट कामाचा फटका?

July 10, 2026
ATS Raid: रायगड ‌‘एटीएस’च्या रडारवर?
sliderhome

ATS Raid: रायगड ‌‘एटीएस’च्या रडारवर?

July 10, 2026
गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंची धडाकेबाज कामगिरी
खालापूर

गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंची धडाकेबाज कामगिरी

July 10, 2026
Next Post
माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन

माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?