। पाली/गोमाशी । प्रतिनिधी ।
राजिप शाळा गोमाशी येथे शुक्रवारी (दि.9) मोठ्या उत्साहात क्रांतीदिन साजरा करण्यात आला. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून हर घर तिरंगा, ऑगस्ट क्रांतीदिनाच्या तसेच जागतिक आदिवासी दिनाच्या घोषणा देऊन परिसर दुमदुमून टाकला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, महिला तरुणवर्ग ग्रामस्थ देखील प्रभातफेरीत सहभागी झाले होते. शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खैरे यांनी विद्यार्थ्यांना ऑगस्ट क्रांती दिनाचे तसेच जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व सांगितले. याशिवाय सामूहिक तिरंगा शपथ देऊन उपस्थितांचे आभार व्यक्त केले.