| पनवेल | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या परंपरेत खंड पडू नये यासाठी मध्यवर्ती कमिटीची परवानगी घेऊन पनवेल आणि उरण मतदारसंघात 1 ऑगस्ट रोजी कार्यक्रम घेतला. त्याच वेळेस आपणाला माजी आ. विवेकानंद पाटील यांना जमीन मंजूर झाल्याची बातमी आली. त्यावेळेस सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला, याचा अभिमान वाटतो, असे माजी आ. बाळाराम पाटील यांनी सांगितले. ते रविवारी (दि. 11) पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पनवेल विधानसभा चहापान कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी पंढरपूर येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.
यावेळी पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, पनवेल कृषी उत्पन्न बाजार सभापती नारायण घरत, डॉ. दत्तात्रय पाटील, पनवेल विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, विलास फडके, राजेश केणी, नगरसेवक गोपाळ भगत, नगरसेवक विष्णू जोशी, नगरसेविका प्रीती जॉर्ज, देवा मढवी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बाळाराम पाटील यांनी, विधानसभा निवडणुकीसाठी नवीन याद्या आल्या आहेत, त्या दुरुस्त करून आल्या आहेत, त्यावर आपण सर्वांनी आपले काम सुरु करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश केणी यांनी केले, तर आभारप्रदर्शन नंदकुमार भोईर यांनी केले.