। सातारा । प्रतिनिधी ।
पुणे-बेंगळुरू महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एसटीच्या पुढील चाकाखाली दुचाकीस्वार अडकल्याने दुचाकी काही अंतर रस्त्यावर घासत गेली. त्यामुळे स्पार्किंग झाल्याने या आगीत एसटीसह दुचाकी स्वार जळून खाक झाला.
ही घटना बुधवारी (दि. 14) सायंकाळच्या सुमारास घडली. पुण्याहून पलूसकडे हि बस जात होती. या बसमध्ये जवळपास 35 प्रवासी होते. पाचवड गावच्या हद्दीत पेट्रोल पंपासमोर अज्ञात मोटारीने अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकीस्वाराला एसटी बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकीचालक बस खाली येऊन दुचाकी भरधाव बसबरोबर दोनशे फूट पुढे घसटत गेली. त्यामुळे स्पार्किंग होऊन दुचाकीने पेट घेतला व त्याचवेळी एसटी बसही पेटली. एसटी बसला आग लागल्याचे समजताच चालक व वाहकाने प्रवाशांना तातडीने खाली उतरण्यास सांगितले. मात्र, घाईगडबडीत प्रवाशांच्या बॅगा एसटीतच राहिल्या. दरम्यान एसटी बसखाली असलेली दुचाकी चालकासह पेटतच होती. त्यात दुचाकी चालकाचा होरपूळ मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस ठाण्याचे कर्मचारी व अग्निशामक दल दाखल घटनास्थळी झाले. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र, यात प्रवाशांच्या सामानासह बसचे मोठे नुकसान झाले आहे.