| कल्याण | प्रतिनिधी |
एकीकडे राज्यात मतदान पार पडत असताना बुधवारी (दि.20) कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात काही नशेखोर तरुणांनी एका महिलेची छेड काढल्याचे पाहायला मिळाले. यानंतर त्या महिलेने तरुणाला चोप देत चांगलाच धडा शिकवला. सकाळी 5.30 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे कल्याण स्टेशन परिसरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात काही नशेखोर तरुणांनी एका महिलेची छेड काढल्याचे पाहायला मिळाले. यानंतर त्या महिलेने तरुणाला चोप देत चांगलाच धडा शिकवला. सकाळी 5.30 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे कल्याण स्टेशन परिसरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेने प्रशासन आणि स्थानिक पोलिसांसमोर परिसरातील सुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे उपस्थित केला जात आहे. यामुळे अशा अनधिकृत गाड्यांवर कारवाई करून त्यांना हटवावे. तसेच, स्थानक परिसरात पोलीस गस्त वाढवून सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.