। अलिबाग । प्रतिनिधी ।
गुंतवणूकीच्या नावाने ज्यादा मोबादल्याचे अमिष दाखवून अलिबागमधील एका व्यक्तीची आर्थिक लूट करण्यात आली आहे. त्याच्या खात्यातून तब्बल 54 लाख 95 हजार रुपये लंपास करण्यात आल्या आले आहेत. ही घटना या आठ दिवसात घडली आहे. याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिबाग तालुक्यातील पिंपळभाट येथील ए. ए.4 ए. एफएफआय. आरएमए. कॅपिटल टेडींग गाईड या ग्रुपची मेंबर व इतर मंडळींनी फिर्यादीला ज्यादा मोबदल्याचे अमिष दाखवून रक्कम गुंतविण्यास भाग पाडले. ज्यादा रक्कम मिळणार या आशेने फिर्यादीने विश्वासाने 54 लाख 95 हजार रुपये जमा केले. ही घटना सात ते 13 ऑगस्ट दरम्यान घडली असून याप्रकरणी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक नदाफ करीत आहेत.