। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल विधानसभा क्षेत्रात शेतकरी कामगार पक्षाच्या कामाची पद्धत पाहून तसेच कळंबोलीतील शेकापचे युवा नेते बंटी पाटील यांच्या कामावर विश्वास ठेवून गुरूवारी (दि.15) पक्षाच्या पनवेलमधील मध्यवर्ती कार्यालयात ऋषिकेश भगत, जय चौधरी, अनिकेत कलागटे, अमर हिरवे, संविधान कांबळे, गणेश पारसे यांच्यासह शेकडो तरुणांनी शेकापमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी माजी आ. बाळाराम पाटील यांनी सांगितले की, आज शेतकरी कामगार पक्षाच्या सानिध्यात आपण आले आहात. आपल्या सर्वांना पक्षात योग्य तो मान आणि सन्मान मिळेल. तसेच, आपल्या विभागातील अडीअडचणी सोडवण्यासाठी आमच्याकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. असे आश्वासन देऊन या सर्व तरुणांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, गणेश कडू, नारायण घरत, देवा मढवी, गोपाळ भगत, बंटी पाटील, विलास फडके आदी मान्यवर उपस्थित होते.