। पनवेल । वार्ताहर ।
दोन दिवसांपूर्वी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी पनवेल स्थानकाला भेट देत तिथे सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. त्याच वेळेस तिथे होणारी वाहतूक कोंडी, रिक्षा चालकांचा प्रश्न यासंदर्भातही समस्या जाणून घेतल्या व शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण व संबंधित शासकीय अधिकार्यांना दोनच दिवसात बैठक घेऊन या विषयात तोडगा काढण्याचे आदेश दिले.
यापूर्वीही तेथील रिक्षाचालक व अनेक प्रवासी यांनी शिवसेनेकडे वारंवार या विषयाचा पाठपुरावा केला होता. शहरप्रमुख प्रसाद सोनावणे यांनी अनेकदा भेट देऊन येथील प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे व रेल्वे प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा केला व अखेर गुरुवारी प्रथमेश सोमण यांच्या नेतृत्वात उपमानगरप्रमुख महेश सावंत, शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, रेल्वेचे स्टेशन मास्तर अग्रवाल, सीआरपीएफ च्या बाबर मॅडम, रेल्वे पोलीस चे निरीक्षक पाडवी, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, परिवहन विभागाचे निरीक्षक भाड, काही जागरूक प्रवासी, रिक्षा संघटनांचे पदाधिकारी या सर्वांना एकत्रित करून एक यशस्वी बैठक संपन्न झाली.