। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
पश्चिम बंगालमधील स्त्री डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि अमानुष खून प्रकरणाच्या निषेधार्थ जंजिरा मेडिकल असोसिएशन मुरुडच्यावतीने मूक मोर्चा काढून निषेध करण्यात आला. या संदर्भातला निवेदन मुरुड तहसीलदार, पोलीस निरीक्षक व वैद्यकीय अधिक्षक यांना देण्यात आला. यावेळी जंजिरा मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ. संजय पाटील, सचिव डॉ.वसीम पेशईमाम, खजिनदार डॉ. अमित बेकर, डॉ.राज कल्याणी, डॉ. मयुर कल्याणी, डॉ. मंगेश पाटील, डॉ. भाविका कल्याणी, डॉ. रविंद्र नामजोशी, डॉ. मकबुल कोकाटे, डॉ. निसार बिरावडकर, डॉ. हितेश जैन, मनिष प्रधान, डॉ. सदफ पेशईमाम, डॉ. शकील परदेशी, डॉ.श्रेया पाटील, डॉ. स्नेहा दिवेकर, डॉ. स्वप्नील दिवेकर, अंजली पाटील, सुनील पटेल, डॉ. खान आदिंसह डॉक्टर उपस्थित होते.