| मुंबई | वृत्तसंस्था |
एसी लोकल चर्चगेटगून विरारला निघाली होती. यावेळी टीसी जसबीर सिंग हे एसी लोकलमध्ये आले. त्यांनी तिकीट तपासण्यास सुरुवात केली. यावेळी त्याठिकाणी असलेल्या तीन तरुणांकडे एसी लोकलचे तिकीट नव्हते. त्यांच्यासाठी फर्स्ट क्लासचे तिकीट होते. या मुद्द्यावरून जसबीर सिंग आणि तीन तरुणांमध्ये वाद सुरु झाला. वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. घटनेची माहिती मिळताच आरपीएफ आणि जीआरपी रेल्वे डब्यात आले. तिन्ही तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी अनिकेत भोसले आणि तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु केली.