। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ही जगातील सर्वात श्रीमंत संघटना आहे. यामुळे या मंडळाचा जागतिक क्रिकेटमध्येही दबदबा पाहायला मिळतो. आता हे वर्चस्व अधिक वाढणार आहे, कारण बीसीआयचे सचिव जय शाह हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या प्रमुखपदी विराजमान होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास जय शाह हे आयसीसीच्या इतिहासात मोठा विक्रम स्वतःच्या नावावर करून घेतील. आयसीसीचे सध्याचे प्रमुख ग्रेग बार्क्ले यांनी तिसर्या पर्वासाठी इच्छुक नसल्याचे मंगळवारी जाहीर केले होते. 30 नोव्हेंबरला त्यांची मुदत संपत आहे आणि यामुळेच जय शाह यांचे नाव या पदासाठी चर्चेत आले आहे. जय शाह या पदासाठी अर्ज करतात का, हे 27 ऑगस्टला होणार्या आयसीसीच्या बैठकीत हे निश्चित होईल.