। पालघर | प्रतिनिधी ।
पनवेल येथे राहणारे विनायक फासे (46) हे वसई-विरार महापालिकेच्या कर विभागात उपमुख्य लेखापरिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचा मोठा मुलगा सिध्दार्थ याला मुंबईत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. दि.19 ऑगस्टपासून त्याचे महाविद्यालय सुरू होणार होते. यामुळे सर्व कुटुबियांनी फिरायला गेले होते. शनिवारी (दि.17) दुपारी ते कुटुंबासमवेत आरे-वारे येथील समुद्र किनारी गेले असता अचानक आलेल्या एका लाटेमुळे सिद्धार्थ पाण्यात ओढला गेला. त्यांच्यासोबत असलेल्या प्रविण बिरादार यांनी त्याला वाचविण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने सिद्धार्थ आत ओढला गेला. यात सिध्दार्थचा बुडून मृत्यू झाला. या धक्क्याने विनायक फासे सावरले नव्हते. विनायक यांना हृृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचाही मृत्यू झाला.