| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड येथील तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या सुयुक्त विद्यमाने ओंकार विद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शनपर शिबीर घेण्यात आले. यावेळी रॅगिंग विरोधी कायदा, स्त्रीभ्रूण हत्या, हुंडा प्रतिबंधक कायदा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
ॲड. अजित चोगले यांनी रॅगिंग विरोधी कायदा या विषयावर मार्गदर्शन केले. ॲड. डी. एन. पाटील यांनी स्त्री भ्रूणहत्या विरोधी कायदा याबाबत मार्गदर्शन केले तर ॲड. मनाली सतविडकर यांनी हुंडा प्रतिबंधक कायदा या कायद्याबाबत माहिती दिली. तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश घन:शाम तिवारी यांनी शाळा महाविद्यालयात होणारी रॅगिंग, त्याचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम, त्याबाबत कायदेशीर तरतूदी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी घन:शाम तिवारी, ॲड. एस. जी. जोशी, सचिव ॲड. डी. एन. पाटील, ॲड. अजित चौगले, ॲड.मनाली सतविडकर आदी उपस्थित होते.