| मुंबई | वृत्तसंस्था |
मुंबईतल्या नेरूळ येथील दोन रिअल इस्टेट एजंट्सच्या हत्या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. जमिनीच्या खरेदीविक्रीच्या व्यवहारात झालेल्या आर्थिक वादातून या हत्या झाल्याचे नवी मुंबई पोलिसांनी सांगितले आहे आहे. पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
नेरुळचे रहिवासी असलेले रिअल इस्टेट एजंट आमिर खानजादा आणि सुमित जैन हे गुरुवारी (दि २१) एका मालमत्तेच्या व्यवहारासाठी आपल्या गाडीतून निघाले होते. परंतु ते घरी परतले नाल्यामुळे ते दोघंही बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या तपासात सुमित जैन यांचा मृतदेह पेणमध्ये, तर आमिर खानजादा यांचा मृतदेह कर्नाळा अभयारण्यात मिळाला होता. जमिनीच्या व्यवहारात आर्थिक वादामुळे ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.