। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नगिरी शहराजवळील सडामिर्या-जाकीमिर्या भागातील 176.149 हेक्टर खासगी क्षेत्र हे पोर्ट औद्योगिक क्षेत्र अर्थात बंदर एमआयडीसी म्हणून जाहिर करण्यात आले आहे. अधिसूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यापूर्वी मिर्या येथील स्थानिक ग्रामस्थांना याची कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती. अधिसूचना वृत्तपत्रात प्रसिध्द झाल्यानंतर सडामिर्या-जाकीमिर्या येथील ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. या संदर्भात सडामिर्या आणि जाकीमिर्या येथील दोन्ही ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेमध्ये या प्रकल्पाविरोधात ठराव करण्यात आला होता. यानंतर सोमवारी (दि.2) मिर्या येथील अलावा येथे संपूर्ण मिर्या वासीयांची एकत्रित बैठक बोलावण्यात आली होती. याला माजी आमदार बाळ माने, दोन्ही ग्रामपंचायतींचे सरपंच तसेच वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकारी, उद्योजक, व्यावसायिक, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.