। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड समुद्रकिनारा व एकदरा खाडीतून सुमारे 83 प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीचे श्रीसदस्यांनी पुनर्विसर्जन केले आहे. पहाटे पाच वाजल्यापासून सुमारे 25 ते 30 श्रीसदस्यांनी खाडीमध्ये विसर्जित केलेले प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती काढण्यास सुरुवात केली होती. दोन तासांच्या अथक प्रयत्नाने मुरुड समुद्रकिनारा व एकदरा खाडीतून 85 प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपतीच्या मूर्ती मिळाल्या आहेत.
मुरुड मधील श्रीसदस्य दरवर्षी या खाडीतील प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती काढून खोल समुद्रात नेऊन विसर्जित करीत आहेत. याही वेळेला हे सर्व गणपती बोटीच्या साहाय्याने परिसरातील खोल समुद्रात नेऊन विसर्जन करण्यात आले. मुरुड समुद्रकिनारा व एकदरा खाडी उथळ असल्याकारणाने पाण्याच्या ओटीला हे सर्व गणपती वरती येत असतात. या मूर्तींचे विटंबना होऊ नये या उद्देशाने हे श्रीसदस्य ही सेवा करीत असतात.