| नाशिक | वृत्तसंस्था |
नाशिकमध्ये गणपती विसर्जन सुरू असताना मोठी दुर्घटना घडली आहे. गणपती विसर्जनाला गेलेल्या दोन तरुणांचा वालदेवी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात ही घटना घडली आहे. ओंकार गाडे आणि स्वयंम मोरे अशी या बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन तरुणाचा वालदेवी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात ही घटना घडली आहे. ओंकार आणि स्वयंम हे दोघेजण संध्याकाळी मित्रांसोबत गणपती विसर्जनासाठी गेले असता नदीपात्रातील एका खड्ड्यात पडून ही दुर्घटना घडली आहे. गणपती विसर्जनावेळी दोघेजण पाण्याचा अंदाज न आल्याने नदीपात्रातील एका खड्ड्यात पडले. मात्र अग्निशमन दल आणि इतर मदत त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत उशिर झाला. तोपर्यंत दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. तब्बल 1 तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढले. ओंकार शहरातील केटीएचएम महाविद्यालय तर स्वयंम अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता.