| तळा | वार्ताहर |
तळा नगरपंचायतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 स्वच्छता ही सेवा स्वभाव स्वच्छता अभियानांतर्गत सफाई कामगार तपासणी शिबिराचे आयोजन दि.23 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. यावेळी मुख्याधिकारी मनीषा वजाळे नगराध्यक्षा माधुरी घोलप, डॉ. मोघे (प्राथमिक वैद्यकीय अधिकारी) कार्यालय अधीक्षक, इतर कर्मचारी, पत्रकार किशोर पितळे उपस्थित होते. यावेळी 11 सफाई कर्मचार्यांची रक्तदाब, दमा, सर्दी खोकला आदी तपासणी करुन त्यांना टीटी इंजेक्शन दिले. दरम्यान, महिलांच्या आजाराची तपासणी करण्यात आली.






