| लांजा | वृत्तसंस्था |
तालुक्यातील लांजा-साटवली मार्गावर मोठ्या प्रमाणात झाडी-झुडपांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मार्गाच्या दुतर्फा वाढलेली झाडी तोडून मार्ग साफ करावा, अशी मागणी वाहन चालकांमधून केली जाते आहे. तालुक्याच्या पश्चिम भागाला जोडणारा मुख्य मार्ग म्हणून लांजा-साटवली मार्गाकडे पाहिले जाते. सध्या या रस्त्याची नव्याने दुरुस्ती करण्यात आली असली तरी रस्ता झाडी-झुडपांच्या गर्तेत अडकला आहे. त्यामुळे रस्त्याची साईडपट्टी गायब झाली आहे. या मार्गावरील मोठ्या प्रमाणात अनावश्यक वाढलेली झाडी-झुडपे लवकरात लवकर तोडून मार्ग मोकळा करावा अशी मागणी वाहन चालकांमधून होत आहे.