। उरण । प्रतिनिधी ।
संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनच्यावतीने रविवार दि.29 सप्टेंबर रोजी नवीन शेवा येथे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे 230 निरंकारी भक्त आणि ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. संत निरंकारी मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक दत्ताराम पाटील व प्रेमा ओबेरॉय यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंडळाचे क्षेत्रीय संचालक अशोक केरेकर तसेच सेक्टर मधील सर्व शाखा प्रमुख, सेवादल, संचालक व अधिकारी उपस्थित होते.