| पनवेल | वार्ताहर |
निपचित अवस्थेत पडलेला एक अनोळखी इसम आढळून आल्याने सदर इसमास पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले आहे. सदर इसमाच्या नातेवाईकांचा पनवेल शहर पोलिसांकडून शोध सुरू आहे.
सदर इसम 45 ते 50 वर्ष वयोगटातील असून, डोक्याचे केस काळे पांढरे, दाढी मिशी वाढलेली पांढरी, बांधा सडपातळ, उंची अंदाजे 5 फुट, अंगात राखाडी रंगाचा हाफ शर्ट फुल पॅन्ट आहे. सदर इसम निपचित अवस्थेत पडलेला मिळून आल्याने सदर इसमास उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे दाखल केले असता सदर इसमाला मृत घोषित केले आहे. सदर इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दुरध्वनी 27452333 किंवा पोलीस उपनिरीक्षक एस.डब्ल्यू.वायकर मो.नं.8779659508 येथे संपर्क साधावा.