। गडब । वार्ताहर ।
पेण तालुका शांतता कमिटीचे सदस्य एल. के. म्हात्रे यांचे वडील कृष्णा नामदेव म्हात्रे यांचे नुकतेच वयाच्या 85व्या वर्षी वुध्दापकाळाने निधन झाले. त्याच्या अंतयात्रेला, राजकीय, सामाजिक, धार्मिक, प्रशासकीय क्षेत्रातील मंडळीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पाश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, नांतवंडे असा परिवार आहे. त्यांचा नातु प्रज्ञेश म्हात्रे आमेरिकेत नासा संशोधन केंद्रात कार्यरत आहे. त्यांचे दहावे सोमवारी (दि.28) उध्दर पाली येथे होणार आहेत. तर, उत्तरकार्य बुधवारी (दि.30) राहात्या घरी होणार आहेत.