। पनवेल । वार्ताहर ।
नवी मुंबई गुन्हेशाखा अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वपोनि पृथ्वीराज घोरपडे यांना माहिती मिळाली होती की, एक महिला वेश्याव्यवसायाकरीता ग्राहकांना महिला व मुली दाखवून अली अपार्टमेंन्टच्या बाजूला असणार्या बिल्डींगमधील रूममध्ये बोलावून वेश्या व्यवसाय करवून घेत आहे. यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी बनावट ग्राहकाला पाठवून सापळा रचला होता. यानंतर पथकाने रात्रीच्या वेळी ठिकाणी छापा टाकला. यावेळी एका महिलेस वेश्यागमनाकरीता ठेवल्याचे आढळुन आले. यातील दोन महिला आरोपींविरूध्द तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.







