। अलिबाग । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य 50व्या कुमार-कुमारीगट अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेसाठी रायगडचे संघ जाहीर करण्यात आला आहेत. ही स्पर्धा धाराशिव येथील जल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे 27 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत खेळली जाणार आहे. रायगड जिल्ह्याच्या संघ निवडीकरिता जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा 20 ऑक्टोबर रोजी पनवेल येथील जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या आयोजनाखाली आयोजित करण्यात आली होती.
मुलांचा संघ :- जय घाडगे, गौरव टेंबे, भावेश गोविलकर, ध्रुव मोकल, दिपेंद्र पाटील, सुजल मोकल, हिमेश म्हात्रे, साई थळे, पियुष पाटील, सर्वेश गायकर, ओमकार सावंत, सिद्धार्थ पडवळ, मासूम मुजावर, विघ्नेश पाटील, प्रतीक जाधव. राखीव- सुमित गजने, विकी जोशी, विवेक म्हात्रे. प्रशिक्षक- लावण्य मगर. व्यवस्थापक- अक्षय मोरे.
मुलींचा संघ :- वैष्णवी थोरात, संजीवनी जगदाळे, श्रेया पोळ, प्रज्ञा गाडे, दिक्षा पाटील, साक्षी शेट्टी, लावण्या म्हात्रे, अनया अरसूल, तृप्ती टेंबे, उपासना शिगवण, सायली टेंबे, ज्ञानेश्वरी कुपाडे, प्रतीक्षा तालीकोटे, निधी गावंड, सौम्या केणी. राखीव- निहारिका मुंढे, श्रीया भगत, श्रावणी कचरे. प्रशिक्षक- समीर म्हात्रे. व्यवस्थापिका- मीनाक्षी म्हसकर.