जगताप यांनी सर्व घटकांना प्रतिनिधित्व दिले – अल्ताफ काझी
। महाड । वार्ताहर ।
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्नेहल माणिक जगताप यांच्या प्रचारार्थ महाड शहरात शिवसेना कार्यकर्त्यांच्या प्रभागनिहाय बैठकांचा धडाका सुरू असून मुस्लिम बहुल प्रभागामधून जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
महाड शहरातील साळीवडा नाका, खारकांड मोहल्ला, देशमुख मोहल्लामधून स्नेहल जगताप यांना मताधिक्य देणार असल्याचे ग्वाही अल्ताफ काझी यांनी दिली तर स्थानिक स्वराज्य निवडणूक सर्व समाज घटकांना न्याय देण्याचे काम स्व. माणिक जगताप यांनी केले असल्याचे सांगत शिवसेनेच्या उमेदवार स्नेहल जगताप यासुद्धा त्याचीच अंमलबाजवणी करत असल्याचा विश्वास व्यक्त केला.
महाड मोहल्ला येथे झालेल्या या बैठकांमध्ये प्रा. सुर्यकांत शिलीमकर, सुदेश कलमकर, संदीप जाधव, धनंजय देशमुख, उपशहरप्रमुख मंगेश देवरूखकर, विजय तांबट, सुभाष शिरशिवकर, प्रमोद महाडीक, वजीर कोंडीवकर, अस्लम पानसरे, अल्ताफ काझी, तृप्ती रत्नपारखी, अस्मिता शिंदे, गितांजली मोरे, अक्षय दळवी, पुजा गोविलकर, स्मिताली यादव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी विविध मान्यवरांनी आपले मत व्यक्त करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. येणारी निवडणूक ही परिवर्तनाची असल्याचे सांगत महिलांना न्याय देण्याची वेळ आली असून महाडचा राजकीय इतिहास सुवर्ण अक्षरांनी नोंदविला जाणार आहे. यामध्ये मुस्लिम समाजाचा खारीचा वाटा असेल स्व. माणिक जगताप यांनी मुस्लिम समाजाला निवडणूक काळात दिलेले महत्व कधीच विसरता येणार नसल्याचे सांगत त्याची परतफेड स्नेहल जगताप यांना विजयी करत करायची असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.