। सुतारवाडी । वार्ताहर ।
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही दिनांक 30 ऑक्टोबर 2024 रोजी खांब ते पंढरपूर पायी दिंडीचे स्वागत सुतारवाडी नाक्यावर ज्येष्ठ व्यापारी मोहन शेठ दोशी यांच्या निवासस्थानी करण्यात आले. त्यानंतर ही दिंडी खांब ते पंढरपूर या ठिकाणी 30 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीमध्ये पंढरपूर तीर्थक्षेत्राकडे जाणार आहे. या पायी दिंडीचे स्वागत रायगड जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातही मोठ्या भक्तिभावाने होत असते. या पायी दिंडीत परिसरातील अनेक भाविक दरवर्षी सहभागी होत असतात.