| माणगाव | प्रतिनिधी |
तालुक्यातील इंदापूर एस.एस.निकम इंग्लिश स्कूलतर्फे मतदान जनजागृती फेरी दि.2 नोव्हेंबर रोजी काढण्यात आली. विधानसभा निवडणुका दि.20 नोव्हेंबर रोजी होणार असून, या निवडणुकीसाठी शासनाच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली.
इंदापूर एस.एस.निकम इंग्लिश स्कूलतर्फे शाळेच्या परिसरामध्ये इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. घरोघरी जाऊन मतदारांना मतदानाचा अधिकार बजावण्यास सांगून याविषयी जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्ये तयार केली होती. रॅलीच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. या रॅलीमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका रंजिता जाधव, पूर्व प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका संचीता जाधव तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग यांनी सहभाग घेतला होता.