| शिहू | वार्ताहर |
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवार, दि. 2 नोव्हेंबर रोजी नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील कुहीरे, बेणसेवाडी, शिहू, बेणसे, तरशेत या गावांमध्ये नागोठणे पोलिसांनी पथसंचलन केले. विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये या संबंधित डीवायएसपी दौंडकर, नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हे पथसंचलन करण्यात आले. निवडणुकीदरम्यान शांतता सुव्यवस्था कायम राहावी, राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने सीमासुरक्षा दलाचे एक अधिकारी व 50 जवान, नागोठणे पोलीस ठाण्याचे 3 पोलीस अधिकारी, एक महिला अधिकारी व 10 पोलीस अंमलदार यांनी या पथसंचलनामध्ये सहभाग घेतला होता.