| पनवेल | वार्ताहर |
चाचा नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त स्वरसंस्कार संगीत विद्यालयात बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी गाणी, डान्स याबरोबरच जादूगर भिकू शिंदे यांचा जादूच्या प्रयोगांचा मुलांनी आस्वाद घेतला आणि धमाल केली.
स्वरसंस्कार विद्यालयात सर्व वयोगटातील विद्यार्थी असून शास्त्रीय संगीतासोबत सुगम संगीत, पेटी, टॅबला, गिटार, पाश्चात्य नृत्य, भरतनाट्यम, झुंबा तसेच अबॅकसचेही क्लासेस चालतात. 100 हून अधिक विद्यार्थी या विद्यालयात शिकत आहेत व निरनिराळ्या स्पर्धांमध्ये यश मिळवत आहेत.