| पनवेल | वार्ताहर |
हुंडाई कंपनीच्या आय-10 गाडीला अचानकपणे आग लागल्याची घटना शुक्रवारी (दि. 29) सकाळी पनवेलजवळील कोनगाव बीट पोलीस चौकीसमोर घडली आहे.
संजय डुके (46, रा. नारपोली) हे त्यांची हुंडाई कंपनीची आय-10 गाडी घेऊन मुलाला शाळेत सोडण्यासाठी शेडुंग येथे जात होते. त्याचवेळी कोनगाव बीट पोलीस चौकी येथे आल्यावर त्यांच्या गाडीच्या बोनेटमधून अचानक धूर येऊन लागल्याने ते व त्यांचा मुलगा गाडीखाली उतरले व बादलीत पाणी घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला असता आगीचे स्वरुप मोठे झाले. या आगीत गाडी भस्मसात झाली आहे. घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी येऊन त्यांनी आग विझवली. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.