। नागपूर । प्रतिनिधी ।
अंबाजोगाई तालुक्यातील माकेगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना गुरुवारी (दि.28) संध्याकाळी घडली. अंबाजोगाई तालुक्यातील माकेगाव येथील शेतकरी रवी देशमुख यांच्या बैलावर शिवारात बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात बैल ठार झाला आहे. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वनपाल विजया शिंगटे यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला. तसेच, बिबट्या दिसताच वनविभागाशी संपर्क साधण्याचे आणि शेतकर्यांनी शेतात कामे करताना स्वरक्षणासाठी साहित्य वापरण्याचे आवाहन वनपाल अधिकारी विजया शिंगोटे यांनी केले आहे.