| सारळ | वार्ताहर |
डाक विभागासाठी अखंड योगदान देत अलिबाग मुख्य डाकघराचे एसबीसीओ सुपरवायझर प्रवीण साळुंखे 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर 30 नोव्हेंबर रोजी निवृत्त झाले. त्यांचा सेवानिवृत्ती समारंभ अलिबाग मुख्य पोस्ट ऑफिसच्या परिसरात उत्साहात पार पडला.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संजय तळकर होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डाक अधीक्षक सुनील थळकर, सहा. डाक अधीक्षक (मुख्यालय) राकेश मिश्रा, डेप्यूडी डायरेक्टर जीपीओ सुनील पवार हजर होते. दरम्यान, प्रवीण साळुंखे यांना शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. यावेळी समीर म्हात्रे, मनोज आंबुरे, मिलिंद पाटील, नागेश साखरकर, सुरेश खडपे, गिरीश जोशी, रवींद्र घरत, किशोर नाखवा, प्रकाश पाटील, प्रशांत दळवी, विकास पोतदार, प्रशांत नारवेकर, प्रशांत पवार, संजय यादव, योगेश साळुंखे यांनी त्यांच्या सोबतीतील काही अनुभव याप्रसंगी कथन केले. यावेळी त्यांच्या कन्येने माझा आदर्श माझे बाबा असल्याचे सांगत आपल्या बाबांबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद पडके यांनी केले.