माणगाव | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील राजिप शाळा देगाव येथील पदवीधर शिक्षक शंकर दत्ताराम शिंदे यांचा भारतीय पोस्टाने त्यांचे छायाचित्र असलेले टपाल तिकीट प्रकाशित करुन त्यांचा नुकताच आमदार अनिकेत तटकरे यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. शिक्षक शंकर शिंदे यांची एकूण 29 वर्ष सेवा झाली आहे. भारतीय टपालचे माणगाव उपविभागीय अधिकारी धनराज उमाळे, मासिक रयतेचा कैवारीचे कार्यकारी संपादक मिठ्ठू त्रिंबक आंधळे, भालचंद्र खाडे आदी यावेऴी उपस्थित होते.